Viral Video: एखादे नवीन गाणे प्रदर्शित झाले की, ते सोशल मीडियावरही तितकेच चर्चेत येते. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच पाकिस्तानी गायक चाहत फतेह खान यांचे ‘आय हाये ओय होय बदो बदी’ गाणेदेखील खूप लोकप्रिय झाले आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.
पाकिस्तानी गायक चाहत फतेह खान यांचे ‘आय हाये ओय होय बदो बदी’ सध्या खूप चर्चेत असलेले गाणे आहे. इतर गाण्यांप्रमाणे युजर्सना या गाण्याचीदेखील भुरळ पडली आहे. फक्त सामान्य लोकच नाहीत, तर अनेक बॉलीवूड, हॉलीवूड कलाकारांनीही या गाण्यावर तयार केलेल्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात. सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलदेखील चर्चेत असलेल्या विविध गाण्यांवर रील बनवतो. आतापर्यंत अनेक मराठी गाण्यांवरही रील बनवली आहे. अशातच आता किली पॉलने ‘बदो बदी’ गाण्यावर केलेली रीलदेखील व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘बदो बदी’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘ट्रेंडिंग’ असे लिहिलेले दिसत आहे.
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियहून अधिक व्ह्युज आणि ६० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘फॉरेनची सुनबाई’, नऊवारी साडीत परदेशी महिलेचा देसी लूक; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मराठी मुलगी”
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किली पॉल रिस्पेक्ट बटन.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “भावा, याच गाण्याची कमी होती; जी तू आज पूर्ण केलीस.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किती फनी आहेस तू.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.”
दरम्यान, पाकिस्तानी गायक चाहत फतेह खानचे ‘बदो बदी’ हे गाणे जुन्या गाण्याचे नव्याने डब केलेले व्हर्जन आहे. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बनारसी ठग’ चित्रपटातील हे गाणे नूर जेहान या पाकिस्तानी गायिकेने गायलेले आहे. चाहत यांचे हे गाणे एप्रिल महिन्यात यूट्यूबवर रिलीज झाले. या गाण्यात स्वतः फतेह खान आणि वजधन राव रणघार ही सहकलाकार दिसत आहे.