Viral Video: बॉलीवूडमधील एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की, त्यातील डायलॉग, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच आता बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील चर्चेत असलेले ‘तौबा तौबा’ गाणेदेखील खूप लोकप्रिय होत आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.

भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर विक्की कौशल नव्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ खूप चर्चेत आहे. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवीत आहेत. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल खरंच खूप सुंदर डान्स करताना दिसतोय. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत किली पॉलने कॅप्शनमध्ये, ‘हे नवीन गाणे बँगर आहे’, असे लिहिलेले दिसत आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत नऊ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: बापरे! रस्ता ओलांडताना दिसली भलीमोठी मगर; पण पुढच्या १० सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किली तुला सर्व भाषा कशा समजतात?” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुझा डान्स पाहून विक्की कौशलनेही कमेंट करायला हवी” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स किली” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तुझा स्वॅग वेगळाच आहे”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, किली पॉलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील इल्युमिनाटी या गाण्यावरदेखील जबरदस्त डान्स केला होता. तसेच त्याने गुलाबी साडी या गाण्यावरही सुंदर डान्स केला होता.