Viral Video: बॉलीवूडमधील एखादा नवीन चित्रपट चर्चेत आला की, त्यातील डायलॉग, गाणीदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच आता बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील चर्चेत असलेले ‘तौबा तौबा’ गाणेदेखील खूप लोकप्रिय होत आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.
किली पॉलचा बॉलीवूड चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तू टांझानियाचा विक्की कौशल…”
Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करीत आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-07-2024 at 17:49 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video kiley pauls dance on tauba tauba song from bollywood actor vicky kaushal new movie sap