Viral Video: नवीन चित्रपटांमुळे त्यातील गाणीदेखील खूप चर्चेत येतात. त्या गाण्यांवर अनेक लोक रील्स बनवतानाही दिसतात. अनेकदा परदेशातील कलाकारदेखील भारतातील या विविध भाषेतील चर्चेत असणाऱ्या गाण्यांवर रील्स बनवतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच मराठामोळे गुलाबी साडी हे गाणं, पाकिस्तानी गायक चाहत फतेह खान यांचे ‘आय हाये ओय होय बदो बदी’ गाणेदेखील खूप लोकप्रिय झाले आहे. आता या लोकप्रिय झालेल्या गाण्यांमध्ये बॉलीवूडमधील ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातील ‘देखा तेनु’ या नव्या गाण्याची भर पडली आहे. या गाण्यावर प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलची बहीण नीमाने डान्स केला आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेला इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल नेहमीच भारतातील गाण्यांवर रील्स बनवताना दिसतो, बऱ्याच व्हिडीओंमध्ये त्याच्यासोबत त्याची बहीण नीमादेखील दिसते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी किली पॉलने ‘गुलाबी साडी’ गाण्यावरील रील बनवला होता. अशातच आता त्याची बहीण नीमाने ‘देखा तेनु’ या चर्चेत असलेल्या गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नीमा नेहमीप्रमाणे तिच्या पारंपरिक वेशात दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सच्या स्टेप्सदेखील लक्ष वेधून घेत आहेत. नीमाला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. आपला हा व्हिडीओ शेअर करीत नीमाने कॅप्शनमध्ये, ‘ट्रेंडिंग’ असे लिहिलेले दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर नीमाचे इन्टाग्रामवर एक मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि अकरा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने नीमाच्या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स करतेस”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “तुझ्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन खूप कमालीचे आहेत.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “नीमा खूप सुंदर”, तर आणखी काही युजरही “नीमाच्या डान्स आणि एक्स्प्रेशनचे कौतुक करताना दिसत आहेत.”