किंग कोब्रा, जगातील सर्वात विषारी साप आहे. प्रौढ किंग कोब्राची लांबी १० ते १२ फूट आणि वजन २० पौंडांपर्यंत असू शकते. नाग जेव्हा फणा पसरवून उभा राहतो तेव्हा लोकांची अवस्था बिकट होते. किंग कोब्राची लांबी माणसाच्या सरासरी लांबीएवढी असते. किंग कोब्रा सहसा लहान प्राणी किंवा इतर साप खातात आणि जोपर्यंत ते उत्तेजित होत नाहीत, त्यांच्यासाठी मानवांना चावणे अत्यंत दुर्मिळ आहे.
किंग कोब्रा घुसला बाथरूममध्ये
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मोठा किंग कोब्रा एका व्यक्तीच्या घरात घुसला आहे. किंग कोब्रा घराच्या बाथरूममध्ये शिरला, कारण ती जागा थोडीशी थंड आहे. घरातील एका सदस्याने त्यांच्या घरातील बाथरूमचा दरवाजा उघडताच त्यांला धक्का बसतो. व्हिडीओमध्ये, एक माणूस त्याच्या बाथरूममध्ये एका महाकाय सापाचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे, ज्याची शेपटी सीटभोवती गुंडाळलेली आहे आणि त्याचे डोके भिंतीवर आहे.
(हे ही वाचा: पोहताना महिलेच्या कानात घुसला जिवंत खेकडा आणि मग…; बघा धक्कादायक Viral Video)
शरीराभोवती गुंडाळलेला टॉयलेट पेपर
भयानक दृश्यात, किंग कोब्रा आजूबाजूला फिरताना आणि पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या अंगावर एक छोटासा टॉयलेट पेपरही गुंडाळला होता. धोकादायक साप बाहेर येऊ नये म्हणून माणूस बाथरूमचा दरवाजा बंद करतो तेव्हा व्हिडीओ संपतो.
(हे ही वाचा: जग्वारने नदीत उडी मारत केली मगरीची शिकार, शिकारीचा video viral)
(हे ही वाचा: वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! राजपाल यादवचा जिमचा करतानाचा मजेशीर Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. snake_unity नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ ५५ हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.