बरेच लोक जंगल सफारीसाठी जातात. जंगल सफारीचे शौकीन असलेले लोक समोर सिंह पाहून खुश होतात, पण समोर तीन सिंह एकत्र दिसले तर कोणाचीही अवस्था बिकट होऊ शकते. असाच काहीसा प्रकार टांझानियामध्ये सफारीला गेलेल्या लोकांच्या बाबतीत घडला, जेव्हा तीन सिंहांनी त्यांचा मार्ग अडवला. यानंतर सफारीला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली आणि जंगलात वाहतूक कोंडी झाली.

टांझानियामध्ये अनेक लोक वाहनांनी जंगल सफारीसाठी निघाले होते. या लोकांचे नशीब इतके चांगले होते की त्यांना एक नाही तर तीन सिंह दिसले. खरं तर, सिंहही त्या दिवशी चांगल्या मूडमध्ये होते आणि लोकांसमोर आले. जिथून लोक त्यांच्या गाडीतून जात होते, तिन्ही सिंह त्याच वाटेवर आडवे झाले आणि आराम करू लागले. अशा परिस्थितीत पर्यटकांना त्यांच्याकडे पाहण्याशिवाय आणि तिथेच थांबण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. यानंतर एकामागून एक वाहने तिथे थांबली.

८००० मीटर पेक्षा उंच असणारे पाच पर्वत सर करणारी प्रियंका मोहिते आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एकामागे अनेक वाहने थांबली असून मधल्या रस्त्यावर दोन सिंह विसावताना दिसत आहेत. पार्क केलेल्या वाहनांमधून पर्यटक डोकावून सिंहांना विश्रांती घेताना पाहत आहेत. तेवढ्यात त्यांच्या मधून दुसरा सिंह येतो आणि पडलेल्या सिंहांवर झोपतो. यानंतर तिघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

दुसरीकडे वाहनांमध्ये बसलेले लोक तिन्ही सिंहांकडे मोठ्या कुतूहलाने पाहत आहेत. लोकांना समजत नाही आता काय करावं? म्हणूनच ते सिंहांच्या जाण्याची वाट पाहत उभे आहेत. ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Story img Loader