फार वर्षापूर्वी मोबाईलमध्ये तुम्ही स्नेक गेम कधी ना कधी खेळला असालच…आता हा गेम फक्त आठवणीतच राहिला आहे. या स्नेक गेमची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक स्नेक गेमच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर करू लागले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सोनोरन माउंटन किंग स्नेक अशा प्रकारे भिंतीवर चढताना दिसत आहे की तुम्हालाही २००० च्या दशकातील लोकप्रिय ‘स्नेक गेम’ आठवेल.
तुम्ही सापांना जमिनीवर सरपटताना किंवा वेटोळे घालून झाडांवर चढताना पाहिलं असेल, पण तुम्ही कोणताही साप सरळ भिंतीवर चढताना पाहिला आहे का? तेही सरड्यासारखं ? तुम्ही पाहिलं नसेल तर आत्ताच बघा. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक किंग स्नेक विटांच्या भिंतीवर अशा प्रकारे चढतो की नोकिया फोनमध्ये सापडलेला ‘स्नेक गेम’ तुम्हाला आठवेल. किंग स्नेकचा हा व्हिडीओ ज्याने कोणी पाहिला तो अवाक झाला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलगा की मुलगी? हे जाहीर करण्यासाठी अख्खा धबधबाच निळ्या रंगाचा केला
भिंतीवर चढलेल्या सापाचा हा व्हिडीओ कोरोनाडो नॅशनल मेमोरियलने फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबत लिहिले आहे की, हा सोनोरन माउंटन किंगस्नेक आहे, जो पूर्वी स्मारकाच्या भिंतीवर चढताना सापडला होता. १ ऑक्टोबर रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत २.८ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर थक्क झालेले लोक त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, यामुळे मला नोकियाच्या स्नेक गेमची आठवण झाली. तर, दुसर्या यूजरने लिहिले आहे की, हा साप देखील खूपच अप्रतिम दिसत आहे.
आणखी वाचा : VIRAL : सरकारी शाळेची दुरवस्था पाहून ग्रामसभेत मुख्याध्यापकांचा रोष
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत
सोनोरन माउंटन किंगस्नेक हे मध्यम आकाराचे साप आहेत ज्यांच्या शरीरावर लाल, काळा आणि पांढरा क्रॉसबँड असतो. किंगस्नेक वेबसाइटनुसार, सोनोरन माउंटन किंग्स साप ऍरिझोनाच्या मध्य आणि आग्नेय पर्वतीय प्रदेशात आढळतात.
सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडrओ व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना ‘स्नेक गेम’ची आठवण करून दिली आहे. होय, तोच गेम जो तुम्ही मोबाईलमध्ये कधी ना कधी खेळलाच असेल. या गेममध्ये, साप भयानक पद्धतीने वाढतो आणि पुढे सरकतो, ज्याला तुम्ही मोबाईल स्क्रीनच्या भिंतींवर आदळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करता.