कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. असं असतानाच कोकणामधील महाड तालुक्यामधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचं पाणी नदीवरील पुलावरुन जात असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने बस घेऊन नदी ओलांडल्याचं दिसत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाडमधील रेवतळे येथील आहे. या व्हिडीओमध्ये नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही चालकाने बस नदीवरील पुलावरुन नेल्याचं दिसत आहे. या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. या चालकावर कारवाई करण्याची मागणी होत असली तरी ही एसटी नक्की कुठून कुठे जात होती?, एसटीचा चालक कोण होता?, त्याने असा निर्णय का घेतला यासारखे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत.

pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Students brave rope trolleys to reach school in Uttarakhand; viral video sparks outrage
खाली खळखळ वाहणारी नदी, एक दोरखंड अन् ट्रॉलीच्या भरोशावर….शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, Viral Video
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…
leopard was died after being hit by unknown vehicle at Kosdani Ghat on Nagpur-Tuljapur National Highway
यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

२०१६ साली २ ऑगस्ट रोजी रात्री सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्याने दोन एसटी बस नदीच्या पाण्यात पडल्या होत्या. या दुर्घटनेमध्ये २६ जाणांचा मृत्यू झाला होता. असं असतानाही आता महाडमधील हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एसटी महामंडळाने या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पावसाचा जोर…

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात आणि त्यालगतच्या भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागांत संततधार सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही सोमवारी पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होत आहे. रत्नागिरीत सोमवारी दिवसभरात संध्याकाळी पाचपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. या कालावधीत मुंबईत ४७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी आणि विदर्भातील अमरावती, वर्धासह काही ठिकाणी पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरातून सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव पश्चिम-उत्तर भागातील राज्यांपर्यंत आहे. त्यामुळे २३ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांत थांबलेला मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ात काही भागांत पाऊस होतो आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.

२४ तासांतील पाऊस

कोकण : मुरुड (३५० मि.मी.), दापोली (२३० मि.मी.), कणकवली, म्हसळा, श्रीवर्धन (२१० मि.मी.), वैभववाडी (२०० मि.मी.), म्हापरा, पेडणे (१९० मि.मी.), चिपळूण (११८ मि.मी.), हर्णे (१६० मि.मी.), मालवण (१५० मि.मी.), देवगड, मंडणगाव, राजापूर, देवरुख (१४० मि.मी.).

Story img Loader