Bride Groom Viral Video : सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. मोठ्या स्टार्सपासून ते छोट्या स्टार्सपर्यंत आणि अगदी सर्वसामान्य लोकही आपापल्या पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी काहीतरी खास करत असतो. यातील काही लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. अशाच एका हटके लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क नवरीने नवरदेवाच्या भांगात सिंदूर भरलंय. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. त्यासाठी हा VIRAL VIDEO पाहाच.

सामान्यतः लग्नामध्ये नवरदेव आपल्या आपल्या होणाऱ्या पत्नीच्या भांगात सिंदूर भरून तिच्यासोबत आयुष्यभरासाठी लग्न बंधनात अडकतो. पण आज आम्ही जो व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत, तो यापेक्षा थोडा वेगळा आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नव्हे तर चक्क नवरीनेच नवरदेवाच्या भांगात सिंदूर भरलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण विचार करत आहे की, असंही होऊ शकतं का?

खरं तर, व्हायरल होत असलेल्या या लग्नाच्या व्हिडीओमध्ये वधू-वरांची मागणी मान्य करण्यात आल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील कोलकाता इथला आहे. या व्हिडीओमधल्या नवरीचं नाव शालिनी सेन असं असून नवरदेवाचं नाव अंकन मजुमदार असं आहे. वधू रूपात शालिनी सेन खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकताना दिसून येतोय.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाने प्रेरित होऊन या कोलकातामधल्या नवरीने हा निर्णय घेतलाय. गेल्या २ डिसेंबर रोजी त्यांचं लग्न झालं होतं. नवरदेवाच्या भांगात नवरीने सिंदूर भरल्यानंतर दोघे एकमेकांना मिठी देखील मारतात. याचा व्हिडीओ नवरीची बहिण कृतिकाने तिच्या फेसबूक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. विशेष म्हणजे, हे लग्न तीन पुरोहितांनी लावलं होतं. लग्नाचे मंत्र केवळ संस्कृतमध्येच नव्हे तर बांगली भाषेतही बोललं जात होतं. तसंच लग्नातून कन्यादानाचा विधी वगळण्यात आला.

आणखी वाचा : VIRAL : विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकाला मारहाण; आधी कचऱ्याच्या डब्ब्याने मारलं आणि मग कचरा डोक्यावर फेकला…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क दारूची बॉटल घेऊन वरातीत मुलीचा भन्नाट डान्स; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

११ सेकंदाचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. त्याला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ४,५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटिझन्सनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडून काढल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. तर काही जणांनी परंपरेची खिल्ली उडवणाऱ्या या जोडप्यावर टीका देखील केली. त्यांच्या नात्यातील प्रेम पाहून पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहत नाही. आता हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

आणखी वाचा : सर्वात मोठी विषारी कोळी जाळं कशी विणते? कधी पाहिलंय का? पाहा हा VIRAL VIDEO

राजकुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्रलेखाला कपाळावर सिंदूर लावायला सांगतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता ‘तू भी लगा दे’ असे म्हणताना दिसला. हिंदू परंपरेनुसार, पत्नी आपल्या विवाहाच्या पवित्र बंधनाचे प्रतीक म्हणून वधूच्या कपाळावर सिंदूर लावतात. विवाहित स्त्रिया त्यांच्या केसांच्या विभाजीत सिंदूर लावतात.

Story img Loader