तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर डान्सचे वेगवेगळे मजेदार व्हिडीओ तुमच्या नजरेस पडतच असतील. पण आता आम्ही जो व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत तो यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. या व्हिडीओमध्ये पावसात नाचताना इतकी हरवून जाते की तिला स्वतःवर कंट्रोल ठेवताच आलं नाही आणि मग नाचता नाचता तिचा पाय घसरून धापकन खाली पडते. हा व्हिडीओ पाहून काही वेळेसाठी तुमच्या काळजाचा ठोका चूकेल. परंतु नंतर तुमचे हसून हसून पोट दुखायला लागेल.
हा व्हिडीओ एका डान्सप्रेमीचा आहे. त्याचा डान्स पाहून ‘दे माय धरणी ठाय’ असेच काहीसे क्षणभर वाटून जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, एक मुलगी पावसात भिजत रील व्हिडीओ बनवतेय. ती बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘बागी’ चित्रपटातील ‘मैं नाचू आज छम छम छम’ या गाण्यावर ही मुलगी डान्स करतेय. लाल मॅक्सी ड्रेसमध्ये ती डान्स करते. यावेळी डान्स करण्यात ती इतकी मग्न होऊन जाते की तिचा स्वतःतेच भान राहत नाही. अतिउत्साहीपणामुळे डान्सकरता करता या मुलीचा अचानक पाय घसरतो आणि धापकन खाली कोसळते.
आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
त्यानंतर ती लाजून उठते आणि तिचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला थांबायला सांगते. हे पाहून आता नेटकऱ्यांना हसू आवरता येत नाहीय.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक करत वेगवेगळे विनोदी कमेंट्स शेअर करण्यास सुरूवात केलीय.
आणखी वाचा : चक्क कासवाने रिबीन कापून यूके विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचे केलं उद्घाटन, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या शिक्षिकेचा ‘झुमका बरेली वाला’वर डान्स, बड्या बड्या हिरोईन्सही पडतील फिक्या
हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर तो व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून काही यूजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे की, काही म्हणा. पण पोरीने फ्लोअर हालवून सोडला. हा व्हिडीओ एडिटेड आहे की वास्तवातील याचीही पुष्टी होऊ शकली नाही. पण लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत.