Viral Video: समाजमाध्यामांवर सतत नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लोकांचे डान्स, रील्स यांच्यासोबतच प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ देखील सतत समोर येत असतात. अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो, ज्यात कधी एखादा वाघ, सिंह, बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; पण काहीवेळा प्राण्यांचे व्हिडीओ देखील खूप गमतीशीर असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात, आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात चक्क एक बिबट्या समोर असलेल्या प्राण्यांची शिकार न करता, शांत बसलेला दिसत आहे.

अनेकदा बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरकाप उडतो. या हिंस्त्र प्राण्यांना पाहिल्यावर लोकच काय तर प्राणीदेखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत सुटतात. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या आरामात बसलेला दिसत आहे.

Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घनदाट जंगलामध्ये एका झाडावर बिबट्या आरामात बसलेला दिसत आहे. यावेळी त्याच झाडाखाली एक कुत्रा बसलेला दिसत आहे, पण बिबट्या त्याच्याकडे पाहूनही दुर्लक्ष करतो, शिवाय बिबट्याच्या मागे काही माकडं देखील बसलेली दिसत आहे. पण बिबट्या त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष करतो. बिबट्याला असं शांत पाहून सोशल मीडियावर युजर्सही त्याची खिल्ली उडवताना दिसत आहे.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ahirani.memer या अकाउन्टवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या व्यक्तीने ‘काय बिबट्या बनशील रे तू’ असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर आतापर्यंत सत्तावीस हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

या व्हिडीओवर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “हा बिबट्या हाय की चीपट्या आहे”. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे बेनं एवढ्या वर कसं चढलं”. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “बिबट्या रात्री बदला घेणार असेल”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “लाज वाटली पाहिजे बिबट्याला कुत्र्याला घाबरतो”

हेही वाचा: मला वेड लागले प्रेमाचे! भररस्त्यात मुलीच्या भांगेत भरले कुंकू, शाळकरी विद्यार्थ्यांची आशिकी VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पिढी बिघडतेय…”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वी देखील अशाप्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये एक वाघ निवांत बसलेला दिसत होता. त्यावेळी एका जंगली कुत्र्याने त्याला खून्नस दिली होती, तरीही तो जागचा हलला नव्हता.

Story img Loader