Monkey Viral Video: जगात आई आणि तिच्या मुलांमधील प्रेमाची तुलना इतर कोणत्याच नात्याबरोबर केली जात नाही. आईचे प्रेम जेवढे तिच्या मुलांवर असते, तेवढेच मुलांचेही त्यांच्या आईवर प्रेम असते. मग ते आई आणि मूल एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी; त्यांच्यातील प्रेमाचे दर्शन आपल्याला जिकडे-तिकडे पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात आई आणि तिच्या बाळाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अशा प्रकारचेच एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बिबट्याने एका माकडिणीची शिकार केली असून, माकडिणीला आपल्या जबड्यात पकडून तो चालताना दिसत आहे. यावेळी मृत माकडिणीचे जिवंत पिल्लू माकडिणीच्या मिठीत तिला बिलगून बसले असल्याचे दिसत आहे. आपल्या आईचा मृत्यू झाला असल्याचे दिसूनही ते पिल्लू तिला सोडून न जायला तयार नसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओतूल पिल्लाचे त्याच्या मृत आईबद्दलचे प्रेम पाहून कोणत्याही सहृदयी माणसाचे मन गलबलून जाईल हे निश्चित. या व्हिडीओवर भूक, मृत्यू, प्रेम एकाच चित्रात, असे लिहिले आहे.
हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @god_lover_rk या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दोन दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि ६० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कॅमेरामनदेखील पिल्लाच्या मदतीला गेला नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सर्वांच्या आयुष्याचं हेच रहस्य आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “अशी भूक काय कामाची, जी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करेल.” तर चौथ्या युजरने लिहिलेय, “मला खूप वाईट वाटलं हे पाहून.”