Leopard attacks Viral Video: प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे.

प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या अंगणात एक श्वान फिरत असून यावेळी एक बिबिट्या तिथे येतो आणि श्वानावर हल्ला करतो. तो श्वानाला खाण्याचा खूप प्रयत्न करतो, पण श्वान त्याला पळवून लावण्यात यशस्वी होतो आणि आपला जीव वाचवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘म्हणून स्वभाव खूप महत्वाचा असतो…’ भर रस्त्यात मदतीसाठी बिबट्याची धडपड; लोक फक्त पाहत राहिले; पाहा घटनेचा थरारक VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @diario.todounpais या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास २७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “अशा वातावरणामध्ये घरातील लहान मुलं कशी खेळतात?” तर आणखी एकाने लिहिलंय की, “साईज सेम, पण ताकत वेगळी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “श्वानाचे नशीब चांगले आहे.”

Story img Loader