पुण्यातील राजगुरुनगर येथील महावितरण कार्यलयात बिबट्या शिरला आहे. १० जुलै रोजी ही घटना घडली. अचानक बिबट्या कार्यलयात शिरल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. कर्मचाऱ्यांच्या जागरुकतेमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. दरम्यान या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजगुरुनगर येथील महावितरण कार्यलयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरु असताना अचानक बिबट्या शिरला आणि कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. बिबट्याला पाहून लोक चांगलेच घाबरले होते पण सुदैवाने बिबट्यांने कोणावरही हल्ला केला नाही. बिबट्याला पाहताच लोकांनी तेथून पळ काढला आणि खोलीला कुलूप लावले. यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी खिडकीतून बिबट्याला आपल्या कॅमेरात कैद केलं

pune_is_loveee नावाच्या पेजवर बिबट्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात बिबट्या शिरला. काल १० जुलै २०२४ रोजी बिबट्या घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश..!!!”

व्हिडीओत बिबट्या घाबरलेला असल्याचं तुम्ही पाहू शकता. काही लोकांना बिबट्याचे पिल्लू आहे असे वाटत होते पण जेव्हा कर्मचाऱ्यांने नीट पाहिलं तेव्हा पिल्लू नसून मोठा बिबट्या असल्याचा व्हिडीओ दिसून आले. एक कर्मचारी बिबट्या मोठा आहे असे ओरडून सांगत आहे. एक कर्मचारी बिबट्याला गुपचूप बस तिथेच असे म्हणत ओरडत आहे. दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, बिबट्यालानंतर पकडा, आधी ते गुपचूप बस तिथं म्हणणाऱ्याला नारळ आणि श्रीफळ देऊन सत्कार करा”

तर दुसरा गंमतीने म्हणाला, ”लाईट बिल भरायला आला होता काय?” त्यावर दुसरा गंमतीने म्हणाला, “लाईटबील जास्त आले म्हणून तक्रार करायला आला राव”

दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांना ताबडतोत वन विभागाला बिबट्या आढल्याचे कळवले. वनविभागाला बिबट्या पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बिबट्याला जेरबंद केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video leopard enter in mahavitaran office in pune employees got into a tizzy snk
Show comments