Leopard Viral Video: प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे.

प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
A old man strangles a dog
‘त्याने प्राण्याचा जन्म घेऊन चूक केली?’ भररस्त्यात श्वानाला गळफास लावला… ; धक्कादायक VIDEO पाहून संतापले नेटकरी

वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. ही शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात. आता व्हायरल व्हिडीओतही एका बिबट्याने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी घराबाहेर श्वान फिरत असून यावेळी एक बिबट्या तिथे येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. यावेळी बिबट्या अनेक प्रयत्न करून श्वानाला खाण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला यश मिळत नाही, त्यामुळे तो श्वानाला तिथेच ठेवून निघून जातो.

हेही वाचा: आईशप्पथ, चक्क श्वान करतोय बेली डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wilda_nimalpower या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, यावर तीन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “त्याचं नशीब चांगलं म्हणून तो वाचला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मस्त, बरं झालं तो वाचला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “बिबट्या उपाशी राहिला.”

Story img Loader