Leopard Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात. या व्हिडीओत अशीच एक घटना पाहायला मिळत आहे.

प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे.

वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. ही शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात. आता व्हायरल व्हिडीओतही एका बिबट्याने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका घराच्या अंगणात एक व्यक्ती झोपली असून त्याच्यापासून काही अंतरावर एक श्वान झोपलेला दिसत आहे. यावेळी एक बिबट्या तिथे येतो आणि हळूच श्वानाला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @animals_suuu या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “आज श्वान नसता तर त्या व्यक्तीला खाल्लं असतं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “श्वानाने त्याचा जीव वाचवला”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूपच वाईट घटना.”

हेही वाचा: ‘आयुष्यात एकतरी मित्र असा हवा…’ बिबट्याने मित्राला पकडल्यावर दुसऱ्याने वापरली युक्ती… VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही सिंहाचे शावक म्हशीची शिकार करताना दिसले होते.