Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो; प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. माणसं ज्याप्रमाणे दोन वेळची भूक भागवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बिबट्या एका माकडाची शिकार करण्यासाठी जंगलात अनोखा डावपेच आखताना दिसत आहे. शिकारीसाठी बिबट्याने केलेली युक्ती पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याला माकड दिसते. त्यावेळी माकड आपला जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी बिबट्या माकडाच्या दिशेने हळुवारपणे जाऊन, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो; परंतु बिबट्या आपल्याकडे धावत आल्याचे पाहून माकड तिथून पळ काढते. पण, बिबट्या वेगाने माकडाला पकडून, त्याच्यावर हल्ला करतो.

हेही वाचा: ‘डान्स असावा तर असा…’ ‘गनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वी अशा प्रकारचे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात कधी वाघ, सिंह जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी इतर प्राणी हिंस्र प्राण्यांनी केलेली शिकार त्यांच्या तावडीतून हुशारीने स्वतःसाठी मिळवताना दिसतात.