Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो; प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो. त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील जंगलातील प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा, असं वाटतं. त्यामुळे तोदेखील आपली कोणी तरी शिकार करण्याच्या तयारीत आहे, असे त्याच्या लक्षात आल्यास, तो जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून पळत असतो. अनेकदा त्याची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा ती अखेरची ठरल्याने त्याला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात एक बिबट्या हरणावर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
bmc will provide free Shadu soil and space to sculptors for eco friendly Ganeshotsav
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलात बिबट्या हरणाला आपल्या तावडीत पकडून, तो हरणावर बसल्याचे दिसत आहे. यावेळी बिबट्या आसपास बराच वेळ पाहतो. शिकार तावडीत सापडूनही बिबट्या आजूबाजूला नक्की काय पाहतोय याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, त्यानंतर बिबट्या हरणाला खाण्याचा प्रयत्न करतो. पण, यावेळी हरीण पळून जायचा प्रयत्न करते म्हणून बिबट्या पुन्हा त्याला पकडतो.

हेही वाचा: ‘असा डान्स आजवर पाहिला नसेल…’ भावाने गायलेल्या गाण्यावर बहिणीने धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @thedreamsmpserver8373 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बिबट्या एक उत्तम शिकारी आहे.” दुसऱ्याने लिहिलेय, “हा माझा फेवरेट प्राणी आहे.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “बिबट्या एवढा गोंधळलेला का आहे?” आणखी एकाने लिहिलेय, “आयुष्याचा संघर्ष.”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सिंहाचे काही शावक म्हशीची शिकार करताना दिसले होते.

Story img Loader