जंगलाचा राजा सिंह आणि तितकाच भीतीदायक असणारा वाघ यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. या दोघांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योगही काही व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतो. पण आता चक्क त्यांच्या पिल्लांचा एकमेकांसमोर आल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चकित करणारा आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये वाघाचे आणि सिंहाचे पिल्लू एकमेकांसमोर आल्याचे दिसत आहे. एकमेकांना पाहिल्यावर ही पिल्लं काय करणार याची उत्सुकता वाढते. पण ही पिल्लं एकमेकांशी खेळू लागतात. एकमेकांना जमीनीवर पाडत, हाताने एकमेकांना मारत ही पिल्लं खेळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ:
हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अचंबित झाले असून, ‘हे दृश्य फार गोंडस आहे’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओला १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.