Viral Video: जंगली प्राण्यांना जवळून पाहण्याकरिता काही जण आवर्जून ‘जंगल सफारी’साठी जातात. पण कधी कधी या जंगली प्राण्यांच्या खूप जवळ जाणंदेखील अनेकांसाठी जीवघेणं ठरतं. समाजमाध्यमांवर अनेकदा अशा प्रकारचे जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. अशातच आता जंगल सफारीतील एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एका कुटुंबातील लोक जंगलात फिरताना अचानक त्यांच्यासमोर सिंहाचं लहान पिल्लू येतं. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर आता पुन्हा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एका कुटुंबातील चार व्यक्ती जंगलातून पायी चालताना दिसत आहेत; तर एक व्यक्ती मागून व्हिडीओ शूट करीत आहे. चालता चालता पुढे गेल्यावर त्यांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये सिंहाचे एक पिल्लू दिसते. त्यावेळी सर्व जण त्या पिल्लाला पाहण्यासाठी थांबतात. तसेच ती व्हिडीओ काढणारी व्यक्तीही पिल्लाच्या खूप जवळ जाऊन त्याचा व्हिडीओ काढते. त्यावेळी ते पिल्लूदेखील त्याच्याकडे पाहताना दिसत आहे. त्यानंतर ती व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत पुढे निघून जाते. जंगलातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पाकिस्तानी पतीने लग्नात का गिफ्ट केला माजी पंतप्रधान इम्रान खानचा ‘तो’ फोटो? नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा एकच भाव होता की…

पाहा फोटो :

हा व्हिडीओ X (ट्विटर)वरील @Crazy Clips या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास साडेचार लाखांहून अधिक व्ह्युज आणि तीन हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये, ‘कुटुंबीय जंगलातून फिरता फिरता आश्चर्यचकित होतात’, असं लिहिलं आहे.

या व्हायरल व्हिडीओवर एका युजरनं कमेंट करून लिहिलं, “आशा आहे ते कुटुंबीय आता ठीक असतील.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “नशीब या ठिकाणी फक्त सिंहाचं पिल्लू होतं.” तर आणखी एका युजरनं लिहिलंय, “व्वा! हा किती छान अनुभव होता”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video lion cub seen in jungle safari brave boy went closer and took a video sap
Show comments