Lion viral video: सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो एक शक्तिशाली शिकारी आहे. ज्यामुळे इतर प्राणी त्याला घाबरतात. सिंहाची डरकाळी ऐकू आली तर लांब-लांबपर्यंत प्राणी पळ काढतात. एवढंच काय तर अनेकदा वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी देखील त्याच्या वाटेला जात नाहीत. पण असं असलं तरी देखील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. सिंह खतरनाक असला तरी कुटुंबासमोर मात्र त्याचं काही चालत नाही. अन् असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. वाघ, सिंह हे जितके खतरनाक तितकीच त्यांची पिल्लं गोड आणि गोंडस दिसतात. ही एवढीशी पिल्लं आपल्याला काय करणार, असंच आपल्याला वाटतं. पण शेवटी पिल्लू असलं तरी ते खतरनाक प्राण्यांचं आहे हे विसरून चालणार नाही. सिंहाचे छोटेसे बछडेही सिंहासारखेच असतात. या सिंहाच्या पिल्लानं काय केलं तुम्हीच पाहा.

बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मूळापासून नेहमी घट्ट असतं. प्राण्यांच्याही बाबतीत असंच असतं याचंच उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये सिंहाच्या पिल्लानं सिंहाची म्हणजेच त्याच्या वडिलांची झोपलेले असताना छेड काढली. आता पुढे काय झालं तुम्हीच पाहा.

एका सिंहाच्या पिल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या खोडकरपणामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये, सिंहाचे पिल्लू त्याच्या विश्रांती घेत असलेल्या पालकांकडे हळूच जाताना दिसत आहे. पिल्लाला वाटतं आपण आलोय ते कळणार नाही पण दबक्या पावलांनी येत असतानाच सिंह जागा होतो आणि जोरात डरकाळी फोडतो. यावेळी सिंहाचं पिल्लू चांगलंच घाबरलेलं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/AMAZlNGNATURE/status/1900816722539802980

“सिंहाचे पिल्लू पालकांना घाबरवते” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडिओला एक्सवर १.२ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या असंख्य प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर येत आहेत. लोक या पिल्लूचे कौतुक शेअर करत आहेत.

एका वापरकर्त्याने कमेंट केली, “हे पिल्लू त्याच्या अटींवर आयुष्य जगत आहे, आणि मला ते खूप आवडते!” दुसऱ्याने म्हटले, खूप गोंडस!” दरम्यान, इतरांनी वन्यजीव किती खेळकर असू शकतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Story img Loader