Viral Video Today: आजवर अनेक अभ्यासकांनी सांगितल्यानुसार म्हैस ही सिंह व वाघ अशा जंगली प्राण्यांचे आवडते खाद्य आहे. भल्या मोठ्या म्हशीचा फडशा पाडला तर एखाद्या जंगली प्राण्याची दोन दिवसांसाठी तरी सोय होऊ शकते, त्यामुळे बहुतांश मांसाहारी प्राणी हे शिकारीसाठी म्हशींना लक्ष्य करतात. असं असलं तरी म्हैस किंवा रेडा ही शक्तिशाली प्राणी आहेत त्यांची शिकार करणे हे काही सोप्पे काम नाही, अगदी जंगलाचा राजा सिंह सुद्धा म्हशींच्या शिकारीला जाण्याआधी दोनदा विचार करत असावा. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील सिंहाच्या बछड्याला याबाबत काही कल्पना नसावी असे दिसतेय. आई बाबांना बघून एक सिंहाचा बछडा म्हशीवर धावून गेला खरा पण पुढे जे झालं ते बघून नेटकरी पार हादरून गेले आहेत.
सहसा सिंहाचा बछडा हा १६ महिन्यांपर्यंत आपल्या आई वडिलांच्या देखरेखीत असतो, त्यानंतर हळूहळू जंगलाचे हे राजपुत्र सुद्धा शिकारीला जातात. सुरुवातीच्या काळात अगदी मोठ्या प्राण्यांवर हल्ला करायला जात नाहीत पण हा व्हायरल बछडा मात्र याला अपवाद आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की बछडा कदाचित म्हशींची शिकार करायलाच जात होता. एवढ्यात म्हशींनी त्या बछड्याच्या भोवती घोळका केला, यातील एका म्हशीला इतका राग आला की तिने आपल्या शिंगाने बछड्याला हवेत भिरकावले. आपण बघू शकता की एखाद्या फुटबॉलसारखीच अवस्था या बछड्याची झाली आहे.
सिंहाचा बछडा म्हशीवर हल्ला करायला गेला अन..
Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार
‘earth.reel’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांना सिंहाच्या बछड्याची दया आली तर काहींनी त्याला अति आत्मविश्वास नडल्याचे म्हंटले आहे. अनेकांनी या व्हिडीओ कर्माचे फळ मिळतेच अशीही कमेंट केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकी कोणाची चूक वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.