Viral Video: समाज माध्यमांवर अनेकदा विविध प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यातील बरेच व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ म्हटल्यावर युजर्सही ते आवडीने पाहतात, कारण त्यातील अनेक गोष्टी आपल्यासाठी कधीही न पाहिलेल्या किंवा अधिक माहिती मिळवून देणाऱ्या असतात. दरम्यान, आता एक थरारक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यामध्ये असं काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलात असो किंवा माणसांच्या आयुष्यात असो, अनेकदा एकट्या व्यक्तीला पाहिल्यावर लोक नेहमीच त्याच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन आपला डाव साधतात. जंगलातील प्राणीदेखील एकट्या प्राण्यावर नेहमी हल्ला करण्यासाठी पुढे येतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ खूप चर्चेत असून, नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये सिंहाच्या शावकांचा एक कळप एकट्या जिराफाला पाहून शिकार करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी ते सगळे मिळून जिराफावर हल्ला करतात. यावेळी तो जिराफ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु त्या एकट्याचे सिंहांच्या कळपापुढे काहीच चालत नाही. मग सगळे जण मिळून जिराफाला खाली पाडतात आणि त्याच्या शरीराचे लचके तोडतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

हेही वाचा: ‘आरारारा खतरनाक…’ चिमुकलीने केला ‘चुटामल्ले’ गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @latestkruger या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५० मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय की, “व्हिडीओ शूट करणाऱ्याने त्याला वाचवलं का नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप दुर्दैवी”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा निसर्गाचा नियम आहे; पण ते पाहून मला वाईट वाटले.” आणखी एकाने लिहिलेय, “सिंहाची जात खूप क्रूर आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video lion cubs attack giraffe you will get shocked after seeing the video sap