Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.

माणूस असो किंवा प्राणी, प्रत्येकासाठी आपली भूक भागवणं खूप महत्त्वाचं आहे. आपली भूक मिटवण्यासाठी ज्याप्रमाणे माणूस दिवस-रात्र कष्ट करतो, त्याचप्रमाणे जंगलातील प्राणीदेखील प्रयत्न करताना दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, ज्यात एका म्हशीवर सिंंहाचे शावक क्रूर हल्ला करताना दिसत आहेत.

हेही वाचा: काय ते एक्स्प्रेशन अन् काय ते ठुमके… ‘सलामे इश्क मेरी जान’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका म्हशीवर सिंहाचे तीन शावक क्रूर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी ते तिच्या अंगाचे लचके तोडत असून हल्ल्यांच्या वेदनेमुळे म्हैस कळवळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @MacKrugerWildlifeVideos या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाल्या असून यावर पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिलेय, “खूप भयानक हत्या.” तर दुसऱ्या एकाने लिहिलेय, “क्रूर सिंह”, तर आणखी एकाने लिहिलेय, “वाईट अंत.” आणखी एकाने लिहिलेय, “वेदनादायक आहे हे सर्व.”

Story img Loader