Viral Video Animal Fight: सिंहीणी हल्ला करायला जाताना नेहमीच घोळका करून जातात. खरंतर एका सिंहिणीच्या ताकदीपुढेच भलेमोठे प्राणीही दुर्बळ ठरतात मग विचार करा जेव्हा चार सिंहीणी एकत्र येऊन हल्ला करतील तेव्हा समोरच्याची काय अवस्था होईल. जर लॉजिकने विचार केला तर निश्चितच अमुक एक प्राणी आणि चार सिंहीणी या लढाईत कोणीही डोळे मिटून सिंहिणीच जिंकेल असे अंदाज लावू शकतो. पण म्हणतात ना कधी दृढनिश्चयाच्या पुढे परिस्थितीही झुकते. लॉजिक नव्हे तर मॅजिकची शक्ती दाखवणारा एक किस्सा अलीकडेच जंगलात घडला होता. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर ‘wildlifeculture1’ पेजद्वारे शेअर केलेला हा व्हिडीओ मूळ ‘latestkruger’ या पेजवर पोस्ट करण्यात आला होता. आफ्रिकेतील ही एक हटके लढाई सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. जवळपास ११ लाखाहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या या व्हिडिओत नेमकं आहे तरी काय हा प्रश्न आम्हालाही पडला होता. जेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा अंगावर येणारा काटाच याचे उत्तर देऊ शकेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत आपण पाहू शकता की एका मगरीवर काही सिंहिणीच्या चमूने हल्ला चढवला होता. मगरीचा पाय आपल्या जबड्यात धरून सिंहीणी तिचा फडशा पाडण्याच्या तयारीत होत्या. पण इतक्यात मगरीच्या अन्य मैत्रिणी सुद्धा तिच्या बचावासाठी आल्या. पुढे काय घडलं ते तुम्ही स्वतःच पाहा…

सिंहिणीचा मगरीवर हल्ला

Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स पाहायला मिळत आहेत, अनेकांना मगरीची दया येतेय तर सिंहिणीच्या ताकदीला काहीजण नमन करत आहेत. यापूर्वीही अनेकदा सिंहिणींचा असा हल्ला पाहायला मिळाला आहे, यात दिसून आल्याप्रमाणे सिंहीणी नेहमीच सावध राहून हल्ला करतात जर समोरचा प्राणी त्यांना भारी पडतोय असे वाटले की त्या तिथून अक्षरश पळ काढतात. पण निदान तोपर्यंत त्या प्राण्याने तग धरून राहणे गरजेचे ठरते.

Story img Loader