Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह झेब्रांवर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह एका झेब्रऱ्याची शिकार करण्यासाठी जंगलात वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एका ठिकाणी दोन झेब्रा उभे असून यावेळी त्यांच्या मागू हळूच एक सिंह येतो. झेबऱ्याला सिंहाची चाहूल लागू नये म्हणून सिंह खूप शांत पद्धतीने मागच्या बाजूने येऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि जसा तो झेब्राच्या मागे उभा राहतो, तसा तो थेट आक्रमक होऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण, यावेळी दोन्ही झेब्रा सावध होतात आणि जिवाच्या आकांताने पळत सुटतात. यावेळी भूकेने खवळलेला सिंहदेखील त्यातील एका झेब्राचा पाठलाग करतो. झेब्राही पळता पळता सिंहाला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो, पण पुढे जाऊन शेवटी सिंह झेब्राला पकडण्यात यशस्वी होतो.

हेही वाचा: “आईशप्पथ ‘तो’ असं काही करेल वाटलं नव्हतं…” वृद्ध महिलेच्या घरात घुसून माकडाने मारली मिठी अन् धारदार नखांनी केलं असं काही.. VIDEO पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Clawfings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “सिंहाविरुद्ध झेब्रा” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे असे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात हिंस्र प्राणी शिकार करण्यासाठी त्यांच्या युक्तीचा कसा वापर करतात, हेदेखील पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video lions ploy to attack two zebra users also shocked sap