Viral Video: हल्ली अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह एका झेब्र्याची शिकार करण्यासाठी जंगलात वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, सिंहाची आपल्या आसपास असल्याची चाहूलही जंगलातील इतर प्राण्यांसाठी भीतीदायक असते. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं; त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह झेब्य्रावर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये सिंहाने झेब्य्राच्या कळपात शिरकाव केला असून तो यातील एका झेब्य्रावर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करतो आणि त्याला आपल्या पंजात पकडून त्याच्यावर हल्ला करतो.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @BBC या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “तो आपल्या शिकारीवर कसा हल्ला करतो ते पाहा, तो खूप मजबूत आहे, त्याचे स्नायू मजबूत आहेत आणि त्याची मुद्रा खूप आकर्षक आहे. किती छान गोष्ट आहे”, तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, अरे व्वा, सिंहाची शक्ती पाहा! हे आश्चर्यकारक आहे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “शेवटी हा निसर्गाचा नियम आहे.”

दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे असे अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात हिंस्र प्राणी शिकार करण्यासाठी त्यांच्या युक्तीचा कसा वापर करतात, हेदेखील पाहायला मिळालं होतं.