Viral Video: लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणीची जगभरात ओळख आहे. पूर्वी फक्त महिलाच लावणी सादर करताना दिसायच्या; पण आता पुरुष मंडळीही लावणी सादर करताना दिसतात. सोशल मीडियावर लावणीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधलं गेलं आहे.

हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात. अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असतं. एखादं नवीन गाणं आलं की, ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकविलेल्या कविता त्यांच्या लक्षात राहत नाहीत; पण रील्समध्ये मुले चित्रपट आदींतील गाणी पटापट बोलत असताना दिसतात. दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकला लावणीच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी याच चिमुकल्याची त्याच्या शाळेतील कार्यक्रमात सादर झालेली लावणी खूप व्हायरल झाली होती. त्याच्या या व्हिडीओनंतर त्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा त्याच्या शाळेच्या अंगणात उभा राहून लावणीच्या ठेक्यावर ताल धरताना दिसत आहे. यावेळी त्याचा डान्स पाहण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बाहेर येऊन उभे राहतात. त्याचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ X वरील @ViralConte97098 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “आपली गौतमी पाटील.. एक नंबर रे भावा सलाम आहे तुझ्या डान्सला तर.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “स्वर्ग म्हणजे जिल्हा परिषद शाळा.” तर एकानं लिहिलंय, “सगळ्या लावणीसम्राज्ञींच्या तोंडात मारलं.” आणखी एकानं लिहिलंय, “काहीही म्हणा पण भाऊच करिअर झालं म्हणून समजा. कमी वयात जास्त प्रगती. लावणी कलाकार फिक्स.”

Story img Loader