Viral Video: हिंदू धर्मात गाईला गोमाता, असं म्हटलं जातं. आई मानून तिची पूजा केली जाते. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. काही वर्षांपूर्वी असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता. यावेळी गायदेखील त्या चिमुकल्याला स्वतःच्या बाळाप्रमाणे जीव लावताना दिसली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक चिमुकला गाईबरोबर असं काहीतरी करताना दिसतेय, जे पाहून युजर्सही त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ नेहमीच चर्चेत येतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचे हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळतं; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमतीजमती पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात एक चिमुकला गाईची सेवा करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोठ्यामध्ये गाय खाली बसून चारा खाताना दिसत आहे. यावेळी चिमुकला गाईच्या पायाला स्वतःच्या हाताने दाबून मसाज करताना दिसत आहे. त्यानंतर तो गाईच्या चेहऱ्याला हात लावून तिचा चेहरा कुरवाळतो. गाय आणि चिमुकल्याचं हे क्युट बॉण्डिंग पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lay_bhari_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली, “अरे व्वा! याहून सुंदर काय असू शकतं,” असं लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: ‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरनं लिहिलंय, “शेतकऱ्याचा पोरासाठी गाय, बैल हा काळजाचा विषय आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “छान बाळ आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “मुक्या प्राण्यांना जीव अशा प्रकारे लावला जातो.” आणखी एकानं लिहिलंय, “मीपण लहान असताना माझ्या गाईचे पाय दाबायचो. खूप खूश असायचो.”