Viral Video: “लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं”, असं आपण नेहमीच म्हणतो. लहान मुलं खरंच खूप निरागस असतात; त्यामुळे ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप गमतीशीर वाटते. सोशल मीडियावर नेहमीच लहान मुलांचे असे अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी ते रील्स बनविताना, तर कधी विनोदी व्हिडीओ करताना दिसतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकली, असं काहीतरी करताना दिसतेय, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

हल्ली सोशल मीडियावर काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. नवनवीन गाणी, रील्स, डान्स, कॉमेडी व्हिडीओ अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. या व्हिडीओंमुळे काही क्षण का होईना आपलं मनोरंजन होतं. बरेच लोक सोशल मीडियावर घरातील गमतीजमतीदेखील शेअर केल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लहान मुलीला पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Funny Video Viral you will laugh after seeing what these four drunk people did
“डोंट ड्रिंक अँड डाईव्ह खूपचं मनावर घेतलंय”; मद्याच्या नशेत तरुणांनी केलं असं काही की, VIDEO पाहून पोट धरून हसाल
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी फ्रिज उघडून, त्यात ठेवलेला खाऊ खाताना दिसतेय. यावेळी ती चक्क फ्रिजमध्ये उभी राहिल्याचं दिसतंय. या व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकलीच्या घरच्यांना ती लपून फ्रिजमधील खाऊ खात असल्याचं कळताच, घरातील एक व्यक्ती व्हिडीओ शूट करीत फ्रिजचा दरवाजा उघडते. यावेळी फ्रिजचा दरवाजा उघडल्याचं पाहून ती मुलगी घाबरते आणि खाली मान घालून तिथून निघून जाते. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Figen या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं कॅप्शनमध्ये, ‘तुम्ही डाएटवर आहात हे सगळ्यांना सांगून जेव्हा तुम्ही पकडले जाता’, असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘अगं पोरी जरा हळू नाच’, बाईकवर मागे बसून चिमुकली करतेय डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “पप्पांची परी…”

पाहा व्हिडीओ: (See Video)

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

तसेच या व्हिडीओवर एका युजरनं, “व्वा! खूप सुंदर”, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “आम्हाला इथे एक कुकी मॉन्स्टर मिळाला.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “मध्यरात्री थोड्या प्रथिनांमध्ये काय चूक आहे. मला ते बाळ आवडलं.” आणखी एकानं लिहिलंय, “मीही असाच आहे.” दरम्यान, यापूर्वी देखील सोशल मीडियावर अशाप्रकारचे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Story img Loader