Viral Video: सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील लहान मुलगी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
हल्लीच्या अनेक मुला-मुलींना त्यांच्या लहानपणापासूनच नृत्याची आवड असते. त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी लावणी करताना दिसतं, तर कधी कोणी विविध सुंदर डान्स करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी छम छम करता है या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. ती करत असलेला डान्स, त्यातील स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी तिच्यासह तिची डान्स शिक्षिकादेखील नाचताना दिसतेय. या दोघींच्या डान्सचे सोशल मीडियावर अनेक जण खूप कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tvishabharti या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास पाच दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर नाचते.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कमाल नाचतायत दोघीपण.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “दोघींचे एक्स्प्रेशन्स आणि डान्स कमाल.” आणखी अनेक युजर्स त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.