Viral Video: लहान मुलं जेवढी निरागस असतात तितकीच ती खोडकरही असतात, त्यामुळे ते नकळत कधी काय करतील याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. त्यांना आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना नसते. त्यामुळेच बऱ्याचदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. ज्यात कधी नकळत तोंडात पैसे घालणे, तर कधी खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी आई-वडिलांच्या नकळत खाणे, खेळत खेळत दुर्घटना होईल अशा ठिकाणी जाणे; अशा घटनांमध्ये अनेकदा चिमुकल्यांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून काही क्षण तुमचाही थरकाप उडेल.

सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, ज्यात कधी धडकी भरवणारे व्हिडीओ पाहायला मिळतात, तर कधी आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशाच दोन लहान चिमुकल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात असं काहीतरी होतं जे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातील हौदाच्या कट्ट्यावर दोन लहान मुलं खेळत असून त्यातील एक चिमुकली पाण्यात पडते. पाण्यात पडलेल्या चिमुकलीला पाहून कट्ट्याच्या बाजूला बसलेला चिमुकला मोठमोठ्याने रडू लागतो. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे बाबा धावत येतात आणि पाण्यात पडलेल्या चिमुकलीला सुखरूप बाहेर काढतात. क्षणाचाही विलंब झाला असता तर त्या बाळाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @enamul___hoqe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आयुष्यात एकतरी मित्र असा हवा…’ बिबट्याने मित्राला पकडल्यावर दुसऱ्याने वापरली युक्ती… VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “नशीब चांगलं आहे त्याचं म्हणून”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाबा सुपर हिरोसारखे धावले”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “लहान मुलांवर लक्ष ठेवायला हवं.”

Story img Loader