सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील लहान मुलांचेही बरेच व्हिडीओ असतात. लहान मुलांची निरागसता टिपणारे, मोठ्यांची नक्कल करतानाचे त्यांचे गोंडस व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे असतात. तर काही व्हिडीओंमध्ये लहान मुलांचे कौशल्य थक्क करणारे असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक चिमुकली दोन्ही हातांनी लिहताना दिसत आहे.
लहान मुलांना अभ्यासाचा भरपूर कंटाळा येतो, तर काही मुलांना त्याची भयंकर भीती वाटत होती. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये याउलट परिस्थिती दिसत आहे. व्हिडिओ दिसणारी लहान मुलगी मन लावून अभ्यास करताना दिसत आहे, इतकेच नाही तर ती चक्क दोन्ही हातांनी लिहीत आहे. तिचे हे कौशल्य थक्क करणारे आहे, पाहा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video
व्हायरल व्हिडीओ:
या व्हिडीओतील चिमुकलीच्या कौशल्यावर नेटकऱ्यांकडुन कौतुकाचा वर्षाव होत असून, या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.