Viral Video: सुप्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तसेच ते देश-विदेशांतील निरनिराळ्या गोष्टींची दखल घेत असतात आणि एक्स (ट्विटर) वर बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून जुगाड, मजेशीर व अनेक कौतुकास्पद व्हिडीओ शेअर करीत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे एका चिमुकलीच्या कृत्याने आनंद महिंद्रांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओ परदेशातील आहे. एक चिमुकली व्हीलचेअरवर एका व्यक्तीस बसवून रस्ता ओलांडताना दिसत आहे. व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीला घेऊन जाताना रस्त्यावरील सर्व गाड्या थांबल्या आहेत. तसेच रस्ता ओलांडताना चिमुकली खाली वाकते आणि ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्याबद्दल कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून कारचालकांचे आभार मानताना दिसते. एकदा पाहाच हा व्हिडीओ.
हेही वाचा…‘महाराज देश विकला… ‘ भारतात नव्हे तर ‘या’ देशाच्या संसदेत मोदींवर टीकास्त्र? VIDEO चं मूळ काय
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकली व्हीलचेअरवर बसवून एका व्यक्तीस रस्ता ओलांडून घेऊन जात असते. यादरम्यान अगदी तीन वेळा चिमुकली रस्त्यात क्षणभर थांबते आणि तिला रस्ता ओलांडून दिल्याबद्दल वाहनचालकांचे आभार मानते; हे बघून आनंद महिंद्रांचे मन तिने जिंकलं आहे व त्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट करीत लिहिले की, ‘संपूर्ण जग असे का असू शकत नाही’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
तुम्ही लहानपणी मुलांवर जे संस्कार कराल, त्याच संस्कारात मुले वाढतील आणि त्याचा प्रभाव त्यांच्या तरुणपणात ते मोठे झाल्यावर दिसून येईल. म्हणूनच मुलांना चांगल्या सवयी लावणे आणि पालक म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे आहे. तर याचं उत्तम उदाहरण सोशल मीडियावर आज पाहायला मिळालं, ज्याचं आनंद महिंद्रांनी कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @anandmahindra या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध शब्दांत चिमुकलीच्या कृत्याचे व परदेशातील या खास संस्कृतीचे कौतुक करत आहेत.