Viral Video: हल्ली सोशल मीडियावर एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं रे झालं की, ते खूप चर्चेत येतं. लाखो लोक त्या गाण्यांवर अनेक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना रील्स बनवल्याशिवाय राहवत नाही. अशी अनेक गाणी मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय गाणं म्हणजे गुलाबी साडी हे आहे. सध्या गुलाबी साडी गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रील्स बनविल्या आहेत. आता अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल.
आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हॉन्स झाली आहेत. त्यामुळे त्यांना कोणती गोष्टी करा हे सांगण्याआधीच ते ती गोष्ट करतात. त्यांना आपण जे सांगतो, जे शिकवतो, त्याच गोष्टी ते लक्षपूर्वक पाहतात आणि करतात. पूर्वीच्या लहान मुलांना कार्टून आणि गेम्स खेळायला आवडाच्या. पण, आताच्या लहान मुलांना सोशल मीडिया पाहणं, रील्स बनवणं या गोष्टी आवडतात. अशा अनेक लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात, ज्यात ते रील्स बनवताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहिल्यावर तुम्हीदेखील कौतुक कराल.
व्हिडीओमध्ये काय आहे? (Viral Video)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान चिमुकली नऊवारी साडी नेसून संपूर्ण मराठमोळा लूक करून गुलाबी साडी या गाण्यावर क्यूट डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. या व्हिडीओच्या सुरुवाताला चिमुकली तयार होताना दिसतेय. त्यानंतर ती तयार होऊन छान पोझदेखील देते. त्यानंतर गोल फिरून ती छान छान स्टेप्स करते. चिमुकलीचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ms_cuddles या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर चार हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप सुंदर दिसतेय”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “माझी बाहुली”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “खूप गोंडस आहे ही”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “खूप छान एक्स्प्रेशन्स.”