सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ पोस्ट करणे हा एक मोठा ट्रेंड बनला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करून आकर्षक रील्स तयार करताना दिसत आहेत. सध्या, ‘इंकेम इंकेम कावाले’ या गाण्यावरील एका चिमुकलीच्या नृत्याने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बरकत अरोरा असे या चिमुकलीचे नाव असून आपल्या डान्स परफॉर्मन्सने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. तिच्या @barkat.arora या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ही चिमुकली पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली साडी परिधान करून पारंपरिक शैलीत नृत्य सादर करताना दिसत आहे. इंकेम इंकेम कावाले’ या दाक्षिणात्या गाण्यावर चिमुकल्याने सुंदर नृत्य सादर केले आहे. नृत्य करताना तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य, हावभाव लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच अवघ्या काही तासांत ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.
हेही वाचा –कंपनी असावी तर अशी! तब्बल १००० कर्मचाऱ्यांना ट्रिपसाठी थेट स्पेनला पाठवले तेही मोफत
u
नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून चिमुकलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना काहींनी बरकत, तुम्ही कोण आहात हेच कळत नाही,” अशा शब्दात कौतुक केले आहे, तर काहींनी “तुमचा प्रत्येक डान्स अप्रतिम असतो आणि तो प्रेक्षकांना भारावून टाकतो,” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने तिला “डान्सिंग क्वीन” असे म्हणत तिच्या ग्रेसफुल शैलीची प्रशंसा केली आहे.
हेही वाचा – बाप रे! मिनीरोबोटने केले १२ मोठ्या रोबोट्सचे “अपहरण”, चीनमधील सत्यघटना! Video Vira
बरकतच्या या परफॉर्मन्सने तिच्या नृत्यकौशल्याबरोबरच तिच्या प्रेक्षकांशी जोडण्याच्या क्षमतेची झलक दिली आहे. तिच्या अद्वितीय शैलीमुळे तिने प्रेक्षकांमध्ये भावना आणि आदर निर्माण केला आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा बरकतच्या डान्स व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे यापूर्वी रमता जोगी गाण्यावर केलेला डान्स देखील नेटकऱ्यांना प्रचंड आवडला होता.