Viral Video: आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हान्स असल्याचे म्हटले जाते. कारण- ते एकदा पाहिलेल्या नवनवीन गोष्टीदेखील लगेच गोष्टी आत्मसात करतात. सोशल मीडियावरदेखील लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात कधी ते रील्स बनवताना दिसतात, तर कधी अभिनय, डान्स करताना, गाणी म्हणताना दिसतात. पण सोशल मीडियाचा वापर योग्य मर्यादित करणंदेखील खूप महत्त्वाचे आहे. नाही तर लहान वयात सोशल मीडियावरचा अतिवापर त्यांच्या भविष्यासह आरोग्यासाठी घातक ठरतो. दरम्यान, आतापर्यंत लहान मुलांच्या डान्सचे विविध सुंदर व्हिडीओ पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोशल मीडियामुळे जगभरातील ट्रेडिंग गोष्टींची आपल्याला माहिती मिळते; ज्यात नवनवीन गाणी, डान्स, डायलॉग व्हायरल होत असतात. व्हायरल गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवत असतात; पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान चिमुकली एक जबरदस्त डान्स स्टेप करताना दिसतेय. ती स्टेप पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
चिमुकलीचा हटके डान्स (Little Girl’s Energetic Dance)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका डान्स क्लासमधील बरीच लहान मुलं-मुली उभी असून, त्यातील एक लहान चिमुकली सुंदर डान्स करीत आहे. या डान्समधील तिच्या स्टेप्स खूप लक्षवेधी आणि हटके आहेत. त्याशिवाय यावेळी तिच्या चेहऱ्यावरील गोड हसू पाहून तुम्हालाही छान वाटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ X(ट्विटरवरील) @Enez Özen या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, माझा दिवस अधिक चांगला बनवणारा व्हिडीओ. “ही मुलगी अप्रतिम नृत्य करतेय”, असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘हे बाळ किती आगाऊ…’ बाबांच्या हातातला घास पटकन ओढला अन् स्वतः खाल्ला VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एकाने लिहिलेय, “फक्त परफेक्ट.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “व्वा! खूप सुंदर डान्स.” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर डान्स स्टेप्स.” एकाने म्हटलेय, “कोणत्या देशातील व्हिडीओ आहे? या लहान गोड मुलीची उत्कृष्ट कामगिरी.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचा डान्स करणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले होते.