Viral Video Today: मगरींचा दरारा हा एखाद्या भल्यामोठ्या प्राण्यालाही हल्ला करताना दोन वेळा विचार करायला लावेल असा असतो. शक्तिशाली मगर पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे एका फटक्यात प्राण्यांना फाडून खाऊ शकते. पण अशाच या मगरीला एका इवल्याश्या कुत्र्याच्या पिल्लाने अक्षरशः पळता भुई थोडी केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून दोन मगरी पळताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओचा शेवट मात्र अगदी धक्कादायक व डोळ्यात पाणी आणणारा आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी कुत्र्याच्या मालकावर ताशेरे ओढले आहेत. एका व्हिडिओसाठी लहानग्या प्राण्याच्या जीवाशी खेळ करण्यावरून नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर धरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक भली मोठी मगर नदीच्या काठावर पानांमध्ये पहुडलेली असते. एवढ्यात अचानक एक पांढरं गुटगुटीत कुत्र्याचं पिल्लू उड्या मारत तिथे येतं व त्या मगरीच्या दिशेने पळू लागतं, खरंतर या दोन्ही प्राण्यांच्या शक्तीची काहीच तुलना होऊ शकत नाही पण अचानक या पिल्लाला पाहून मगरीची पार दाणदाण उडते व ती नदीत पळून जाते. यानंतर हे पिल्लू दुसऱ्या एका मगरीला पळवून लावते, कदाचित दोन वेळा मगरीच्या समोर जिंकल्याने पिल्लाचा आत्मविश्वास जास्तच वाढतो व तिसऱ्यांदा मगरीवर हल्ला करायला जातो. पण यावेळेस मात्र मगरच पलटवार करून त्या पिल्लाचं तोंड जबड्यात पकडून त्याला पाण्यात नेते मग जे होतं ते तुम्हीच पाहा..

कुत्र्याच्या पिल्लाने मगरीला पळवले

Video: पिटबुल कुत्र्याची Viral शिकार! घोड्याचा जबडाच तोंडात धरला तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण

दरम्यान, तुम्ही व्हिडीओमध्ये ऐकू शकता की, व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीही कुत्र्याला जीव वाचवून पळण्यासाठी सांगत आहेत, पण डोक्यात हवा गेलेले हे पिल्लू मात्र अति आत्मविश्वासाने जीव गमावून बसतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून याला ५८ हजार व्ह्यूजमिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून हळहळ व्यक्त केली आहे.