सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये अनेक व्हिडीओ असतात जे पाहून आपल्याला धक्का बसतो. यामध्ये कधी अपघाताचे व्हिडीओ असतात, कधी चोरीचे तर कधी भांडणाचे. तुम्ही मेट्रोमध्ये होणाऱ्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण सध्या एका वेगळ्याच वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका दुकानदार आणि महिला ग्राहकादरम्यान झालेला वादाचा हा व्हिडीओ आहे. वाद इतका टोकाला पोहचला की दुकानदाराने महिलेचा थेट गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून लोक हैरान झाले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुकानातील आहे. एक व्यक्ती अचानक महिलेची वाट अडवतो आणि थेट तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये झटापट होते आणि काही वेळाने तो तिचे हात पाठीमागे पकडून ठेवतो. दरम्यान महिला जोरजोरात ओरडताना दिसते आहे. महिला आसपासच्या लोकांना पोलिसांना बोलवण्यास सांगते. व्हायरल होत असलेला व्हिडीओ लंडनमधील एका दुकानातील आहे. राय लेनवरील ‘पेकहॅम हेअर अँड कॉस्मेटिक्स’ च्या बाहेर ही घटना घडली, जिथे एका महिलेवर चोरीचा आरोप होता.
व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नागरिक
या व्हिडिओने शहरातील पेकहॅम परिसरात संताप आणि निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या प्रत्युत्तरात, शेकडो लोक निषेध म्हणून घोषणा देत रस्त्यावर उतरले. तुम्ही एकाला स्पर्श केला तर तो आम्हा स्पर्श केल्यासमान आहे अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. ”कृष्ण वर्णीय स्त्रियांपासून दूर राहा,” असा संदेश लिहिले हातात फलक घेऊन त्यांनी निषेध व्यक्त केला.
हेही वाचा – साडी नेसून, चप्पल घालून स्पेनमध्ये जॉगिंग करताना दिसल्या ममता बॅनर्जी; स्वतःच शेअर केला व्हिडीओ
नेमका कशामुळे झाला वाद?
पैसे परत करण्याबाबत महिला आक्रमक झाल्याने त्यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. “आम्ही परतावा देत नाही, आम्ही वस्तूंची देवाणघेवाण करतो किंवा क्रेडिट नोट देतो.” असे दुकानदारने सांगितल्यानंतर तिने दुकानाच्या शेल्फमधून काही सामान ( हेअर पॅक ज्याची एकूण किंमत ã२४ – १९९३ रुपये असेल) उचलले आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला. ”महिला दुकानातून जात होती आणि मी तिला थांबवत होतो”, असे दुकानदाराने बीबीसीला सांगितले.
“मी तिला थांबवत होतो. तिने माझ्या तोंडावर चापट मारली आणि खेरीदीच्या सामानाची टोपली पकडून माझ्या डोक्यावर मारली. माझा हात तिच्या गळ्यात कधी गेला ते मला कळले नाही. मी तिला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला मारले नाही,” असेही दुकानादाराने यावेळी सांगितले.
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात सावधगिरीने ४५ वर्षीय व्यक्तीची मुलाखत घेतली. त्याने स्वतःचा बचाव करत सांगितले की, व्हायरल फुटेजमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने समोर आले आहे. व्हिडीओ कॉप केल्याचा दावा त्याने केला. दरम्यान दुकान तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा – ”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल
दुकानातील सीसीटिव्ही फुटेजचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ”ज्यामध्ये महिला जोरजोरात आरडाओरडा करताना आणि संताप व्यक्त करताना दिसत आहे. तसेच ती महिला दुकानदाराला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.” घटनेच्या प्रत्युत्तरात, एका ३१ वर्षीय महिलेला हल्ल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले.