सोशल मीडियावर चहाची क्रेझ आपण सर्वांनीच पाहिली आहे. चहाबद्दलचे व्हिडीओ आणि कविता व्हायरल होत असतात. चहासाठी जन्म आमुचा… असं अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरुवात असो, वा कट्ट्यावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ… चहा हवाच. याच चहावरून देशात राजकारणही रंगलेलं पहायला मिळालं. चहावर सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रमही सुरू केला. त्यामूळे देशाच्या राजकारण ‘चहा’ हा केंद्रस्थानी आला आहे. त्यानंतर देशाच्या अनेक भागांमध्ये चहाच्या दुकानांमध्ये त्यांच्या कडक चहा आणि पंचलाईन देखील व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘ग्रॅज्यूएट चहावाली’ प्रियंका गुप्ता प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर आता ‘महागठबंधन चहावाला’ याचा व्हिडीओ तेजीने व्हायरल होऊ लागलाय. लोक इथे चहा पिण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा