Viral Video: महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती उदभवली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. या सर्व परिस्थितीमुळे काही जिल्ह्यांतील शाळा, ऑफिसना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार पाऊस असूनही अनेक जण पावसाच्या पाण्यात पोहताना, मजामस्ती करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने पाहायला मिळतात. सध्या असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पण, काही तरुण मंडळी पावसाच्या पाण्यात उतरून रील्स बनविताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये काही तरुण साठलेल्या पाण्यात मासेमारी करताना दिसले होते; तर काही जण पाण्यात मॅट टाकून बोटिंग करताना दिसले होते. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक तरुण पावसाला जाब विचारताना दिसत आहे. या मजेशीर व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण भरपावसात पाणी साठलेल्या भागात उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी तो आकाशाकडे हात करून पावसाशी वार्तालाप करताना दिसत आहे. यावेळी तो मोठ्या रडण्याचा अभिनय करीत पावसाला म्हणतो, “अरे, तुझ्या गोळ्या चुकल्यात की काय, बस कर आता किती पडणार आहेस… कपडेही सुकले नाहीत अंगावरचे… बस कर आता!” सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा: ‘शायद कभी ना कह सकूँ…’ गाण्यावर पोलिसानं गायलं सुंदर गाणं, VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @siddhu_2328 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “२०१९ चे शब्द अजून पाठ आहेत भावाला.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “असला video करू नको रे. मागच्या वेळी केलास आणि आमच्या घरात पाणी आलं. ह्या वेळीपण केलास, सामान बांधाय घेतो आताचं.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “तू आला का परत. यंदापण महापूर फिक्स आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “तू लय रडू नको भावा… आधीच ह्या पाण्याचा मेळ बसेना.”