सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ भयानक असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो एवढं मात्र नक्की. कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताचे व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र कार अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एक अतिशय भीषण अपघात होताना दिसत आहे. ज्यामध्ये चालकाच्या चुकीने मोठा अपघात होतो आणि कार रस्त्याच्या कडेला उडून बाजूला पडते आणि वेग जास्त असल्याने चालकाला कार नियंत्रणात ठेवता येत नाही आणि कार उलटते. या कार अपघातात कार उडून पडल्यामुळे कारचा दरवाजा उघडतो आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे ड्रायव्हर अनेक फूट हवेत उंचीवर उडून रस्त्यावर पडताना दिसतो. यानंतर या ड्रायव्हरची अवस्था किती गंभीर झाली आहे ते दिसत आहे. सीट बेल्ट लावणे किती गरजेचे आहे हे, तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – viral video: आरारा खतरनाक! महिलेने जमिनीवर लोळत केला नागिन डान्स अन्..क्षणातच

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे..नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं, सावधान राहण्याचं सांगितलं जातं.