सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळवणं फारच सोपं झालं आहे. अगदी कोणीही एखादा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन रातोरात प्रसिद्ध होऊ शकतो. त्यामुळे लोक अगदी काहीही करतानाचे व्हिडीओ शेअर करु लागले आहेत. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. अजब स्टंट मारून लोकांना चकित करणं या लोकांना खूप आवडतं. पण कुठल्याही सुरक्षेशिवाय असे स्टंट मारणं अंगाशी येऊ शकतं. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पण तरी देखील हे स्टंटबाज मात्र काहीच बोध घेत नाहीत. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणाची स्टंटबाजी
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाईकवर तीन तरुण विना हेल्मेट बसले आहेत. एवढच नाहीतर गाडी चालवणरा तरुण हा रस्त्यावर स्टंटबाजी करत सापाप्रमाणे बाईक चालवताना दिसत आहे. यादरम्यान तरुणाचा दुचाकीवरील तोल जातो, त्यामुळे तिघेही रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकतात. त्यानंतर दुचाकी घासून पुढे जाते, तर हे तरुण खाली पडतात. हा अतिशहानपणा या तरुणांच्या जीवाववही बेतला असता. पोलीस वारंवार हेल्मेटसाठी सूचना देतात तरीही तरुण मात्र याकडे अजूनही गांभीर्याने पाहायला तयार नाहीत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: गंगा नदीत राफ्टिंग दरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी, बचावासाठी तरुणानं मारली वाहत्या पाण्यात उडी अन्…
उत्साहात भान हरपलेली तरुणाई असे स्टंट करताना आता वारंवार दिसत आहे. ज्या दरम्यान अनेकदा अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ @NehaAgarwal_97 नावाच्या प्रोफाइलवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.