Viral Video News : सोशल मीडियावर अनेक लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात पण काही व्हिडीओ विचार करायला लावणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये चिमुकली व्यापारांपेक्षा शेतकऱ्यांना मोठं करा, असे म्हणताना दिसते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
“व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना मोठं करा, चिमुकलीने केली विनंती
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल जी भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्याजवळ बसलेली आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही चिमुकली म्हणते, “व्यापारांकडून शेतमाल घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यांकडून माल घेऊन त्यांना मोठं करा.” या चिमुकलीचे विचार ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “बळीराजा शेतकरी जगवा” (Make farmers richer than businessmen little one requested watch viral video)
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
adira_712 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर लिहिलेय, “शेतकरी जगलाच पाहिजे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंय बाळा” तर एका युजरने लिहिलेय, “तसं होत नाही दीदी, कोणताही व्यवहार करताना एक तरी व्यक्ती मध्यस्ती लागते, तरच तो व्यवहार पूर्ण होतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “लाडु बाई बरोबर आहे तुझं”
या चिमुकलीचे नाव अदिरा औंधकर असून तिचे वडील हे अकाउंट हाताळतात. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अदिराच्या या अकाउंटला अनेक लोक फॉलो करतात. तिचे प्रत्येक व्हिडीओ लाइक करतात आणि तिच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करतात. काही दिवसांपूर्वी या चिमुकलीचा आणखी असाच एक व्हिडीओ चर्चेत आला होता त्या व्हिडीओमध्ये त्या व्हिडीओमध्ये ही चिमुकली म्हणते, “तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो. लोक परत कधी नादाला लागत नाही.” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.