सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही अंगावर शहारे आणणारे असतात. यामध्ये काही मुक्या प्राण्यांमधील वेगवेगळे गुणधर्म दाखवणारेही व्हिडीओ असतात. आतापर्यंत आपण अनेक जंगली प्राण्यांचे उड्या मारतानाचे, माणसांवर हल्ला करतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. या प्राण्यांसोबत सापांचे व्हिडीओही आपणाला पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सापाचे नाव ऐकताच लोक घाबरुन जातात कारण चुकून सापाने आपणाला दंश केला तर जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकजण सापांना घाबरुन असतात. जगभरात सापांच्या हजारो प्रजाती आहेत, ज्यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी असतात. वेळोवेळी त्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.पण सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साप रोमान्स करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंण आहे.

नागाच्या जोडप्याचा रोमान्स –

हा व्हिडीओ नाग नागिणीच्या जोडप्याचा आहे. तसे पाहाता नाग नागिणीचं जोडपं सहसा एकत्र दिसत नाही त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याच्या थंडाव्यात नाग-नागिण रोमान्स करताना दिसत आहे. उन्हाळा सुरु असून आता प्रत्येक जण थंडावा शोधत आहे. अशातच हा व्हिडीओ समोर आला आहे. नाग नागिणीची जोडी पाण्यात मस्ती करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: मेट्रोमध्ये स्टंट करणं तरुणाच्या अंगलट, डोक्याला लागला जबरदस्त मार

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video male and female snake romance video viral srk
Show comments