Viral Video: आई-वडील मुलांना जन्माला घालतात, त्यांचा सांभाळ करतात. वेळ पडल्यास त्यांच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य, स्वप्न, इच्छा बाजूला ठेवतात. आई-वडिलांच्या मुलांप्रति असलेल्या त्यागाची अनेक उदाहरणं तुम्ही आजपर्यंत अनेकदा पाहिली किंवा वाचली असतील. पण, काही पालक असेही असतात की, जे मुलांना फक्त जन्माला घालतात; पण त्यांचा सांभाळ करायला नकार देतात. सध्या अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळे आई-वडीलदेखील मुलांचे शत्रू होऊ शकतात यावर तुमचा विश्वास बसू लागला असेल. आई असो वा बाप त्यांच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकराला असते. परंतु, कधी कधी काहींना या सुखाचे क्षण अनुभवायला मिळत नाहीत. ही विदारक परिस्थिती निर्माण होण्यामागे आई-वडिलांचा घटस्फोट किंवा त्यांचं आपापसांत न पटल्याने त्यांनी मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जाणं आदी कारणं असतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे, जी पाहून अनेक जण तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावातील पुरुषानं आपली तीन मुलं आणि पत्नीला वाऱ्यावर सोडून दुसरं लग्न केलं. ज्यावेळी त्याच्या पत्नीला ही बातमी कळते, तेव्हा ती पतीजवळ जाऊन, तू असं का केलंस? असा जाब विचारत रडायला सुरुवात करते. यावेळी त्यांची मुलंदेखील रडू लागतात. त्यातील एक लहान मूल, घाणेरडे पप्पा आहात तुम्ही, असं म्हणतं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dailynewsbro या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दशलक्षामध्ये व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “ते निरागस मूल म्हणालं, घाणरेडे पप्पा आहात तुम्ही… हे ऐकून मला वाईट वाटलं.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “माझं आयुष्यही असंच काहीसं. माझ्या वडिलांनीही असंच केलं होतं.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “काही पुरुष असेच असतात.” आणखी एकानं लिहिलंय, “बाप नाही; शाप आहेस तू.”