उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक माणूस थुंकून रोटी आणि नान बनवत आहे. त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेला व्हिडीओ गाझियाबादच्या सिहानीगेट परिसरातील चिकन कॉर्नरचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासन कारवाईला लागले आहे. एखाद्या व्यक्तीने थुंकून अन्न शिजवल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस तंदूरी रोटी बनवताना दिसत आहे. रोटी बनवताना तो पीठापासून बनवलेल्या कच्च्या रोटीवर थुंकतो आणि मग ते शिजवण्यासाठी भट्टीत ठेवतो. आणखी बरेच लोक रेस्टॉरंटमध्ये उभे दिसतात. पण कोणाचेही लक्ष या व्यक्तीकडे जात नाही. रेस्टॉरंटच्या बाहेरून कोणीतरी हा व्हिडीओ बनवला आहे, जो आता व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)

रेस्टॉरंट विरुद्ध तक्रार

मीडिया रिपोर्टनुसार, संपूर्ण प्रकरण गाझियाबाद पोलीस स्टेशनच्या सिहानीगेट परिसरातील राकेश मार्गावर असलेल्या चिकन पॉईंटचे असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ दोन दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी गोंधळ घातला आणि चिकन पॉईंटवर कारवाईची मागणी करत निदर्शने केली. त्यानंतर पोलीस कारवाईत आले, रोटी बनवणाऱ्या तमिझुद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले आणि चिकन पॉईंट विरोधात अहवालही दाखल करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: उडण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा प्रयोग; IAS अधिकाऱ्यांनी केला व्हिडीओ पोस्ट)

याआधी असाच एक व्हिडीओ व्हायरल

ही पहिली घटना नाही, याआधीही मेरठमध्ये एका लग्नात थुंकून रोटी बनवण्याचे प्रकरण समोर आले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नौशादला अटक केली. यूपी पोलिसांनी नौशादवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला. या व्यतिरिक्त, या वर्षी मार्चमध्ये देखील, एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात थुंकून रोटी बनवण्याची बाब समोर आली. ज्यात मोहसीन नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man arrested for spitting bread in tundur incident in ghaziabad ttg