Chennai shocking video: सोशल मीडियावर नवरा-बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात. अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता. नवरा बायकोमधील भांडण विकोपाला जाऊन नवऱ्याने बायकोला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर नवऱ्यानं बायकोला पुलावरुन खाली ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवऱ्यानं संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं जातंय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात.

चेन्नईतून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहे, तो माणूस आपल्या पत्नीला पुलावरुन खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. चेन्नईतील कोयंबेडू पुलावर तरुणाने पत्नीला खाली फेकण्याचा प्रयत्न केला. तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चेन्नई पोलिसांनी याची धकल घेत करत रोशन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा गुन्हेगाराला पोलिस येत असल्याचे सांगितले तेव्हा गुन्हेगाराने आपल्या पत्नीला तेथून उचलले आणि पळ काढला.ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, “ज्याने हल्ला केला त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.” उत्तर दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मॅनहोल की मृत्यूचे सापळे? तिची चूक नसतानाही मृत्यूच्या दाराज पोहचली; तामिळनाडूमध्ये भीषण अपघात

डॉ.कार्तिक कुप्पन नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ३ लाख ४६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या पोस्टला लाईकही केले आहे. यावर यूजर्स कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… चेन्नई पोलिसांनी कृपया दखल घ्या आणि त्वरित कारवाई करा. दुसऱ्या युजरने लिहिले… त्याला तुरुंगात पाठवा. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… भयंकर कलयुग आलं आहे.