Viral Video: घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. कधी सासू-सुनेमध्ये, पालक आणि मुलांमध्ये तर कधी पती आणि पत्नीमध्ये लहान-मोठ्या कारणांवरून वाद होतात. पण, काही लोक घरातील भांडण चव्हाट्यावर मांडतात. प्रत्येक व्यक्तीला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. परंतु, अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, प्रचंड मारहाण करतात. असे व्हिडीओ हल्ली सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असतात. कधी पालकांना, मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. हे व्हिडीओ पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अनेक कुटुंबांमध्ये मुलाच्या लग्नानंतर त्याच्या पत्नी आणि आईमध्ये वाद सुरू होतात. कधी कधी हे वाद फक्त शाब्दिक असतात तर कधी कधी हे वाद मारहाण, हत्येपर्यंतही जातात. अनेकदा अशा भांडणांमध्ये मुलगा आईची साथ देऊन बायकोला मारहाण करतो, तर काही घटनांमध्ये मुलगा बायकोला साथ देऊन आईला मारहाण करतो. अनेक प्रकारच्या सत्य घटनांचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. आतादेखील अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये एक पुरुष महिलेला अमानुष माराहाण करत असून यावेळी एक लहान चिमुकली व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीसमोर रडत रडत हात जोडताना दिसत आहे. त्यानंतर मारहाण करणारा महिलेच्या गळ्याभोवती ओढणी बांधून तिला फरपटत स्वयंपाकघरात घेऊन जातो. तिथेदेखील तो तिला लाथा मारायला सुरुवात करतो. यावेळी आणखी एक वृद्ध महिला तिथे उभी असते, परंतु तीदेखील मारहाण करणाऱ्याला अडवत नाही.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @patil_bhau0077 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला हजारो व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अशा लोकांचा जगून तरी काय उपयोग”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अरे ती चिमुकली बघा किती रडतेय, काय परिणाम होईल तिच्या मनावर..” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “विकृत लोक आहेत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती नालायक माणूस आहे हा.”