Man Battles Strong Lashes Of Wind : इयान चक्रीवादळाने फ्लोरिडामध्ये ऐतिहासिक विध्वंस घडवून आणला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या समोर आलेली नाही. फ्लोरिडाच्या इतिहासातील हे सर्वात प्राणघातक चक्रीवादळ ठरलंय. या वादळामुळे परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, रस्त्यावर शार्क मासेही दिसत होते. सोशल मीडियावर वादळाशी संबंधित अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये इतक्या भयानक इयान वादळात सुद्धा एक माणूस जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यासोबत झुंजताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रौद्र रूप धारण केलेल्या इयान वादळाचा वेग पाहून तुम्ही घाबरून जाल. हा माणूस रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसून येतंय. या वाऱ्याचा धोकादायक वेग इतका होता की त्याला साधं उभा सुद्धा राहता येत नव्हतं. वादळी वाऱ्यामध्ये सुद्धा निडरपणे कसं बसं घट्ट एका जागेवर उभं राहण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसतोय. त्याचवेळी वाऱ्यासोबत एका झाडाची तुटलेली फांदी उडत येऊन नेमकी त्याच्या पायाला अडकते. पण तरीही तो तग धरून उभा असतो. मात्र वाऱ्याच्या वेगामुळे त्याचे पाय घसरत होते. यादरम्यान किती तरी वेळा त्याचं नियंत्रण कोलमडतं. पण तो पुन्हा वाऱ्याशी सामना करत घट्ट पाय रोवून उभा राहतो. तेवढ्यात त्याची नजर एका साइन बोर्डवर पडते आणि त्याला पकडण्यासाठी पुन्हा वेगवान वाऱ्याशी झुंज देत हळूहळू साइन बोर्डाच्या दिशेने येतो. बोर्डला पकडून तो बराच वेळ एकाच जागी राहतो. त्यानंतर हळूहळू तो रस्त्याच्या कडेला येतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : Queen Victoria स्टाईलमध्ये या ८९ वर्षीय आजीने साजरा केला वाढदिवस, VIRAL VIDEO ला २३ मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

या व्हायरल व्हिडीओमधला व्यक्ती रिपोर्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या हातात माईक सुद्धा दिसत आहे. जिम कॅंटोरे असं या रिपोर्टरचं नाव असून तो एका हवामान वाहिनीसाठी काम करीत असल्यांचं सांगण्यात येत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक त्याचं कौतूक करताना दिसत आहेत. तर काही यूजर्सनी त्याची हिंमत पाहून “सकाळी घरातून निघताना नाश्त्याला काय खाल्लं होतं?” असा सवाल देखील केलाय.

आणखी वाचा : हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यत या व्हिडीओला २ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader